
चुकीच्या पद्धतीने गाडी चालविल्याने; पुद्दुचेरी एक्स्प्रेस आणि गदक एक्सप्रेसचा अपघात; मध्य रेल्वेची माहिती
मुंबई : गेल्या काही महिन्यापूर्वी पुद्दुचेरी एक्स्प्रेस आणि गदक एक्सप्रेसच्या मुंबईत मोठा अपघात झाला होता. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती. आता हा अपघात चुकीचा पद्धतीने रेल्वे गाडी चालविल्यामुळे झाल्याची माहिती स्वता मध्य रेल्वेने दिली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. १५ एप्रिल २०२२ रोजी रात्री ९ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ ट्रेन क्रमांक ११००५ दादर पुद्दुचेरी एक्स्प्रेस आणि ट्रेन क्रमांक १११३९ गदक एक्सप्रेस या दोन्ही रेल्वे गाड्यांचा मोठा अपघात झाला.
गदक एक्सप्रेस आणि पुदुच्चेरी एक्सप्रेस बाजूने एकमेकांवर आदळल्या, या दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात होत्या आणि क्रॉसिंगवर एकाच ट्रॅकवर आल्याने हा अपघात झाला होता. यामध्ये पुदुच्चेरी एक्सप्रेसचे शेवटचे डबे रेल्वे रुळावरून घसरले. या अपघात एस १, एस २ आणि एस ३ डब्याचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोण्ही जीवित हानी झाली नाही. या भीषण दुर्घटनेनंतर रेल्वेने चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीच्या अहवाल आल्यानंतर नेमकीही दुर्घटना कशामुळे घडली याची माहिती समोर आली नव्हती. आता माहिती अधिकारांतर्गत मध्य रेल्वेने या दुर्घटनेची माहिती दिली आहे.
'या' कारणामुळे घडली दुर्घटना
मध्य रेल्वेने आरटीआयच्या उत्तरात सांगितले कि,पुदुच्चेरी एक्सप्रेसची दुर्घटना ही ओव्हर स्पिडिंग आणि चुकीच्या पद्धतीने रेल्वे गाडी चालविल्यामुळे झाली आहे. गदक एक्सप्रेसच्या लोको पायलट आणि त्यांच्या सहकार्याने दादर टर्मिनस सोडले तेव्हा सिग्नल न बघता पुढे निघाल्याने पुदुच्चेरी एक्सप्रेस धडक दिली. त्यामुळे पुदुच्चेरी एक्सप्रेसचे शेवटचे डबे रेल्वे रुळावरून घसरले होते. तात्काळ लोको पायलटला समुपदेशासाठी आणि पूर्ण प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे.
Web Title: Central Railway Information Driving Erratically Accident Of Puducherry Express And Gadak Express Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..