मध्य रेल्वे प्रवाशांसाठी नवीन वर्षांत नवीन सुविधा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

मुंबई : मध्य रेल्वेच्या स्थानकांवर प्रवाशांना सोयी-सुविधा देण्यासाठी प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. यानुसार सरकते जिने, लिफ्टची संख्या वाढवली जाणार असल्याने पुढील वर्ष प्रवाशांसाठी सुखकर ठरणार आहे. 

रेल्वे स्थानकांवरील सोयी-सुविधांमध्ये दोन वर्षांत वाढ करण्यात आली आहे. येत्या वर्षात त्यामध्ये आणखी वाढ करण्यासाठी मध्य रेल्वेने तयारी केली आहे. त्याची अंमलबजावणी टप्याटप्याने केली जाणार आहे. 

कोणत्या सोयी-सुविधा? 

  • सरकते जिने- 38 ठिकाणी 
  • लिफ्ट- 18 ठिकाणी 
  • डिलक्‍स टॉयलेट- दादर, छत्रपती शिवाजी टर्मिनस, घाटकोपर, लोकमान्य टिळक टर्मिनस, डोंबिवली, कल्याण, मुलुंड, वडाळा रोड, चेंबूर 
  • बायो-टॉयलेट- ए वन दर्जाच्या प्रत्येक स्थानकात अपंग प्रवाशांसाठी ही सुविधा असेल. 
  • रेल्वे स्थानकावरील छत- 15 स्टेशनची निवड करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, केळवली, डोलवली, भांडुप, सोमठाणे, वांगणी, मुलुंड, जिते, लोणावळा, मानखुर्द, पनवेल, लोवजे, कर्जत, पळसदरी, शेलू 

उन्नत तिकीट बुकिंग कार्यालय 
1) दिवा 2) करी रोड 3) भांडुप 

नवीन बुकिंग कार्यालय 
1) रे रोड, 2) कॉटन ग्रीन 3) डॉकयॉर्ड रोड 4) चेंबूर 

पार्किंग 

  • ठाणे स्थानकाच्या पश्‍चिमेला बहुमजली वाहनतळ प्रस्तावित
Web Title: Central Railway to introduce new facilities for passengers