Sat, Sept 30, 2023

Mumbai : भायखळा स्थानकात प्रवासी गाडीखाली आल्याने मध्य रेल्वेचा खोळंबा
Published on : 9 June 2023, 6:02 pm
मुंबई : मध्य रेल्वेच्या भायखळा रेल्वे स्थानकात एक प्रवासी धावत्या लोकल गाडी खाली आल्याने मध्ये रेल्वेच्या डाऊन धीम्या लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे एका मागे एक लोकल गाड्यांचा खोळंबल्या होत्या. सदर प्रवाशाचा मृतदेह ट्रॅकवरून उचलण्यास विलंब झाल्याने दहा-पंधरा मिनिटे गाडी स्थानकातच उभा होती. त्यामुळे परळ, दादर स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.
सायंकाळी ७.५० वाजता एक प्रवासी लोकलमध्ये चढत असताना तो गाडीखाली आला. सदर प्रवाशाचा मृतदेह उचलण्यास विलंब झाल्याने डाऊन मार्गावरील लोकल गाड्यांना विलंब झाला. गर्दीच्यावेळी अपघात होऊन लोकल वाहतूकीत अडथळा निर्माण झाल्याने अनेक गाड्या विलंबाने धावत होत्या.