Sun, Sept 24, 2023

Megablock : मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा; फक्त रविवारी ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक !
Published on : 26 May 2023, 2:58 pm
मुंबई : उपनगरीय रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीकरिता मध्य रेल्वेकडून मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर नियमिपणे घेण्यात येणार मेगाब्लॉक रविवारी नसणार आहे. तर ट्रान्स हार्बर मार्गावर ,रविवार २८ मे रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुख्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रविवारी ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी-नेरुळ दरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११ .१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यत दुरुस्ती करण्यात येणार आहे. या दरम्यान ठाणे ते वाशी-नेरुळ-पनवेल दरम्यानची लोकल सेवा बंद राहणार आहे.ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवासी मुख्य आणि हार्बर मार्गाने प्रवास करू शकणार आहे.