मध्य रेल्वेचा उद्या मेगाब्लॉक 

file photo
file photo

मुंबई : मध्य रेल्वेवर रविवारी (ता. 1) मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम रेल्वेने मात्र ब्लॉक रद्द केला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड-माटुंगा "अप' जलद आणि हार्बर मार्गावर पनवेल-वाशी स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येईल. 

मध्य रेल्वे 
कुठे : मुलुंड-माटुंगादरम्यान छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या (सीएसएमटी) दिशेला "अप' जलद मार्गावर. 
कधी : सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत. 
परिणाम : या स्थानकांदरम्यान "अप' जलद लोकल धीम्या मार्गावर. ब्लॉकमुळे मेल-एक्‍स्प्रेस आणि लोकल सुमारे 20 मिनिटे विलंबाने. दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंत; तिथूनच परतीच्या प्रवासासाठी रवाना. या गाडीसाठी दुपारी 3.40 वाजता दादरहून विशेष लोकल. 

हार्बर मार्ग 
कुठे : पनवेल ते वाशीदरम्यान "अप' आणि "डाऊन' या दोन्ही मार्गांवर. 
कधी : सकाळी 11.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. 
परिणाम : सकाळी 10.03 ते दुोरी 4.01 वाजेपर्यंत सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर, पनवेल-अंधेरी या स्थानकांदरम्यान लोकल वाहतूक बंद. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते वाशी विशेष लोकल. ट्रान्सहार्बर मार्गावरून ठाणे-वाशी/नेरूळ प्रवासाची मुभा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com