Mega Block : मुंबईकरांना रविवारी दिलासा; मुख्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही !

ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक!
central railway operate mega block on trans harbour line on sunday No megablock on main harbor line
central railway operate mega block on trans harbour line on sunday No megablock on main harbor linesakal

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी ७ मे २०२३ रोजी ट्रान्सहार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर ठाणे - वाशी/नेरुळ अप आणि डाउन मार्गावर, तर पश्चिम रेल्वेच्या बोरिवली- गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

central railway operate mega block on trans harbour line on sunday No megablock on main harbor line
Mumbai : गाईंना गुंगीचे औषध देऊन तस्करी; कल्याणमध्ये गो तस्करी करणाऱ्या एकाला अटक

ट्रान्सहार्बर मार्गावर -

कुठे- ठाणे - वाशी/नेरुळ अप आणि डाउन जलद मार्गावर

कधी- सकाळी ११ .१० ते दुपारी ०४.१० पर्यंत

परिणाम-

या ब्लॉकदरम्यान ठाणे येथून वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरूळ/पनवेल येथून ठाणे करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द रहाणार आहे. रविवार मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नसणार आहे.

central railway operate mega block on trans harbour line on sunday No megablock on main harbor line
Mumbai : अंमलीपदार्थ कायद्याअंतर्गत अटक आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; कांजुरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पश्चिम रेल्वे-

कुठे - गोरेगांव ते बोरिवली अप- डाऊन जलद मार्गावर

कधी - शनिवारी रात्री ११. ४५ ते रविवारी पहाटे ४.१५ वाजेपर्यत

परिणाम-

या ब्लॉकदरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा गोरेगांव ते बोरिवली स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या ब्लॉकलमुळे काही लोकल गाड्या लोकल सेवा रद्द असणार आहे. पच्छिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com