मध्य रेल्वेच्या "राजधानी'ला आजपासून कायमची वेळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

मध्य रेल्वेने सुरू केलेल्या सीएसएमटी मुंबई ते हजरत निजामुद्दीन दिल्ली या राजधानी एक्‍स्प्रेसच्या वेळेत सतत बदल होत असल्यामुळे प्रवाशांकडून नाराजीचा सूर उमटत होता. आता नवीन वेळापत्रकानुसार ही गाडी सीएसएमटीहून दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी सुटेल. ही गाडी हजरत निजामुद्दीन येथून सायंकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी मुंबईकडे रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी सीएसएमटीला दाखल होईल.

मुंबई - मध्य रेल्वेवरील सीएसएमटी-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्‍स्प्रेस आता दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी सुटणार आहे. हे नवीन आणि कायमस्वरूपी वेळापत्रक 17 एप्रिलपासून अमलात येईल. या वेळेची प्रवाशांनी नोंद घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

मध्य रेल्वेने सुरू केलेल्या सीएसएमटी मुंबई ते हजरत निजामुद्दीन दिल्ली या राजधानी एक्‍स्प्रेसच्या वेळेत सतत बदल होत असल्यामुळे प्रवाशांकडून नाराजीचा सूर उमटत होता. आता नवीन वेळापत्रकानुसार ही गाडी सीएसएमटीहून दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी सुटेल. ही गाडी हजरत निजामुद्दीन येथून सायंकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी मुंबईकडे रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी सीएसएमटीला दाखल होईल. नवीन वेळापत्रकामुळे राजधानी एक्‍स्प्रेसचा वेग वाढणार असून, प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. ही गाडी सुरुवातीला दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी सुटत होती.

राजधानी एक्‍स्प्रेसची 1 जूनपासून प्रथम श्रेणीचा एक वातानुकूलित डबा, द्वितीय श्रेणीचे पाच वातानुकूलित डबे, तृतीय श्रेणीचे 11 वातानुकूलित डबे आणि एक खानपान डबा, अशी रचना असेल. प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे राजधानी एक्‍स्प्रेस ऑगस्टपासून आठवड्यातील पाच दिवस चालवण्यात येण्याची शक्‍यता आहे. या गाडीचा वेग वाढवण्यासाठी पुश-पुल इंजिन पद्धतीचा वापर केला जात आहे.

Web Title: Central Railway Rajdhani Express Time