अरेरे! मध्य रेल्वे पुन्हा ठप्प, चाकरमान्यांचा खोळंबा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

आज (ता. 9) सकाळी-सकाळीही चाकरमान्यांना ठप्प झालेल्या मध्य रेल्वेला तोंड द्यावे लागले. टिटवाळा-खडवली ट्रॅकवर रेल्वे रूळाला तडा गेल्याने ही रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.

मुंबई : चाकरमानी कामाला निघायच्या वेळीच रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची परिस्थिती काही नवीन नाही. अशाच प्रकारे आज (ता. 9) सकाळी-सकाळीही चाकरमान्यांना ठप्प झालेल्या मध्य रेल्वेला तोंड द्यावे लागले. टिटवाळा-खडवली ट्रॅकवर रेल्वे रूळाला तडा गेल्याने ही रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या विस्कळीत रेल्वेसेवेमुळे कसारा-कल्याण दरम्यानची वाहतूक बंद पडली आहे. कामावर जाण्याची वेळ असल्याने लोकांवर अडकून पडण्याची वेळ आली आहे. खडवली, आसनगाव वासिंद येथील लोकल जागेवर उभ्या आहेत. रूळ दुरूस्तीचे काम सुरू असून, लवकरात लवकर वाहतूक सुरळीत व्हावी अशी प्रवाशांची अपेक्ष आहे. 

ई-सकाळच्या ट्विटची रेल्वे प्रशासनाकडून दखल

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मागच्या आठवड्यातच दोन वेळा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. एकदा रेल्वेला तडा गेल्याने व दुसऱ्यांदा रेल्वेगेटला डम्परने धडक दिल्याने ही वाहतूक ठप्प झाली होती.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Railway Service Affected due to problem on railway track