सिनेमांच्या शुटींगमधून रेल्वेने कमावले एवढे पैसे..

सिनेमांच्या शुटींगमधून रेल्वेने कमावले एवढे पैसे..

मुंबई : मध्य रेल्वेला चित्रीकरणातून चालु वर्षाच्या जानेवारी ते ऑक्‍टोबर या पहिल्या10 महिन्यांमध्ये तब्बल 1 कोटी 15 लाखांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये दरबार आणि दबंग 3 च्या चित्रीकरणामुळे रेल्वेला 37 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. 

रेल्वे स्थानके चित्रपट, जाहिराती आणि लघुचित्रपटांच्या चित्रीकरणासाठी देण्यात येतात. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी स्थानकावर चित्रीकरणासाठी सर्वाधिक रक्कम आकारली जाते. सीएसएमटी स्थानकाचा दर्जा अव्वल असल्याने येथे एका दिवसाच्या चित्रीकरणासाठी सुमारे दीड ते2 लाख रुपये आकारले जातात.

जानेवारी ते ऑक्‍टोबर दरम्यान मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर 17 चित्रपट, लघु चित्रपट आणि जाहिरातीचे चित्रीकरण करण्यात आले. त्यामध्ये अफसोस, मलंग, रात अकेली है, हरामी, दरबार, विजेता, दबंग 3, लाल सिंग चड्डा यांचा समावेश आहे. दबंग3 या चित्रपटाचे चित्रीकरण साताऱ्या जवळील वाठार स्थानकात1 दिवस झाले असून त्यामधून रेल्वेला15 लाख 70 हजार182 रुपयांचा महसुल मिळालेला आहे.

तर पनवेल स्थानकात दरबारचे चित्रीकरण 9 दिवस झाले, त्यामधून22 लाख10 हजार679 रुपयांचे उत्पन्न रेल्वेच्या तिजोरीत जमा झाले. 

चित्रपट  रेल्वेला महसूल 
अफसोस 1,42,022 
मलंग 6,89,540
रात अकेली है 7,14,729
हरामी 3,20,986
दरबार 22,10,679
विजेता 14,62,873
दबंग 3 15,70,182 
लाल सिंग चड्डा 1,71,275 

प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य 

स्थानकावर चित्रीकरण करण्यासाठी रेल्वेच्या विविध विभागांची परवानगी घेण्यात येते. विशिष्ट दिवस,ठिकाण,वेळ आणि स्थानकाच्या दर्जानुसार रक्कम आकारली जाते. चित्रीकरणामुळे प्रवाशांची कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये याची दक्षता घेतली जाते, त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येते असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. 

Webtitle : central railways earned over crore rupees from movie shoots

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com