
काश्मीरमधील महिला शिक्षिकांना शस्त्र वापरायला परवानगी द्या - नीलम गोऱ्हे
मुंबई : काश्मीरमध्ये सध्या टर्गेट किलिंगचा प्रकार सुरु आहे. यामध्ये हिंदू सरकारी अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचे प्रकार घडत आहेत. मंगळवारी एका महिला शिक्षिकेची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. याचा निषेध करताना देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता शिवेसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी कडवी प्रतिक्रिया दिली आहे. गरज पडल्यास इथल्या महिलांना बंदुका बाळगण्याची परवानगी द्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे. (Centre govt to ensure teachers safety & give them weapons if needed says Neelam Ghore)
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, काश्मीरमधील शिक्षकांच्या सुरक्षेची हमी केंद्रानं द्यावी, हे अत्यंत महत्वाचं आहे. तसेच गरज पडल्यास त्यांना बंदुका बाळगण्यालाही परवानगी द्यावी. या ठिकाणी मुलींना त्यांच्या हक्कांबाबत जागृत करणाऱ्या शिक्षकांना टार्गेट केलं जात आहे. त्यांना महिलांना पुन्हा आपल्या घरांमध्ये बंदिस्त करुन ठेवायचं आहे.
हेही वाचा: काश्मीर : टार्गेट किलींगनंतर हिंदू कर्मचार्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
दरम्यान, मंगळवारी कुलगाममध्ये हिंदू महिला शिक्षिका रजनी बाला यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. गेल्या 5 महिन्यांतील ही 16वी टार्गेट किलिंगची घटना होती. यापार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात काम करणाऱ्या हिंदू समाजातील सर्व सरकारी कर्मचार्यांना जिल्हा मुख्यालयातच तैनात केलं जाईल, असा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
आधीपासूनच सुरक्षित ठिकाणीच आपल्याला पोस्टिंग मिळावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने होत होती. गेल्या महिन्यात बडगनच्या दुर्गम भागातील चांदुरा येथील तहसील आवारात घुसून राहुल भट यांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली होती.
Web Title: Centre Govt To Ensure Teachers Safety Give Them Weapons If Needed Says Neelam Ghore
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..