छगन भुजबळ आज बॉम्बे रुग्णालयात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या हृदयाचे ठोके अनियमित होण्याचे कारण शोधण्यासाठी डॉक्‍टरांनी काही चाचण्या सुचवल्या आहेत. त्यातल्या थॅलियम सिटीस्कॅन तपासणीसाठी भुजबळांना मरिन ड्राईव्ह येथील बॉम्बे रुग्णालयात हलवले जाणार आहे.

भुजबळ यांना उद्या (ता. 3) जे. जे. रुग्णालयातून बॉम्बे रुग्णालयात हलवले जाईल. त्यांच्या हृदयाचे ठोके अनियमित होत असून, याचे कारण शोधण्यासाठी त्यांना हॉल्टर नेक तपासणी, थॅलियम सिटीस्कॅन आणि इलेक्‍ट्रो फिजिऑलॉजी स्टडी या चाचण्या करण्यास डॉक्‍टरांनी सुचवले होते. त्यापैकी इलेक्‍ट्रो फिजिऑलॉजी आणि हॉल्टर नेक तपासणी झाली आहे. भुजबळांची प्रकृती स्थिर असून तपासण्यांच्या निष्कर्षानंतर त्यांना ऑर्थर रोड तुरुंगात हलवले जाणार जाईल, असे सांगण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chagan bhujbal in bombay hospital