छगन भुजबळ यांची जे. जे. रुग्णालयात रवानगी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

मुंबई - काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये अटक झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना बुधवारी (ता.7) रात्री 8च्या सुमारास बॉम्बे हॉस्पिटलमधून पुन्हा जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची लवकरच अँजिओग्राफी करण्यात येणार आहे. भुजबळांची अँजिओग्राफी करण्याची गरज असल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात हलवण्याची विनंती करणारे पत्र बॉम्बे रुग्णालय प्रशासनाने ऑर्थर रोड तुरुंगाच्या प्रशासनाला केली होती. तुरुंग प्रशासनाच्या सूचनेनुसार भुजबळ यांना जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. रक्त आणि अन्य तपासण्यांचे अहवाल आल्यानंतर भुजबळांची अँजिओग्राफी करण्यात येईल.

मुंबई - काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये अटक झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना बुधवारी (ता.7) रात्री 8च्या सुमारास बॉम्बे हॉस्पिटलमधून पुन्हा जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची लवकरच अँजिओग्राफी करण्यात येणार आहे. भुजबळांची अँजिओग्राफी करण्याची गरज असल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात हलवण्याची विनंती करणारे पत्र बॉम्बे रुग्णालय प्रशासनाने ऑर्थर रोड तुरुंगाच्या प्रशासनाला केली होती. तुरुंग प्रशासनाच्या सूचनेनुसार भुजबळ यांना जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. रक्त आणि अन्य तपासण्यांचे अहवाल आल्यानंतर भुजबळांची अँजिओग्राफी करण्यात येईल. ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात अस्वस्थ वाटू लागल्याने भुजबळांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या हॉल्टर नेक, इलेक्‍ट्रो फिजिओथेरपी आणि ईसीजी या चाचण्या झाल्या होत्या.

Web Title: chagan bhujbal shifted to j. j. hospital