सोनसाखळी चोरांना ठाण्यात अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

ठाणे - नंबर प्लेट नसलेली वाहने वापरून सोनसाखळी चोरी करणाऱ्या भिवंडीतील पिराणी पाड्यातील आरपात शौकत अन्सारी (वय २३) आणि नबीउल्ला मुबारक हुसेन खान (२२) या दोन सोनसाखळी चोरांना ठाणे पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख ५९ हजार ९०० रुपयांचे २० ॲन्ड्राईड फोन आणि एक लाख ३१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्यावर यापूर्वी भिवंडी, भोईवाडा, खार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

ठाण्यातील चितळसर मानपाडा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक पी. व्ही. सुर्वे आणि त्यांचे पथक पोलिस ठाण्याच्या परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाकडून वसंतविहारच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीवर नंबर प्लेट नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. 

पोलिसांनी दुचाकीवरील तरुणांना थांबण्याचा इशारा केला; मात्र त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना थांबवले. त्यांच्याकडे कागदपत्रे नव्हती. विचारपूस केल्यानंतर आरपात आणि नबीउल्ला पिराणी पाडा भिवंडी येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. या दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी ठाणे, भिवंडी आणि नालासोपारा येथून फोन चोरल्याची कबुली दिली, अशी माहिती चितळसर पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिस हवालदार टी. डी. बांगर, पोलिस नाईक एस. आर. पाटील, पोलिस नाईक आर. एस. जाधव, पोलिस शिपाई पाटील यांनी आरोपींना पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Web Title: Chain robbers arrested