अध्यक्षांवर सीसी टीव्हीचा वॉच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

मुंबई - महापालिकेच्या विविध समित्यांच्या अध्यक्षांना नवी चकाचक दालने देण्यात आली आहेत. आता या दालनांतील प्रत्येक हालचालीवर सीसी टीव्हीचा वॉच राहणार आहे. या सर्व दालनांमध्ये महापालिकेने सीसी टीव्ही बसवल्यामुळे अध्यक्ष नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

महापालिका मुख्यालयाचे नूतनीकरण सुरू आहे. यात स्थायी समिती अध्यक्षांचे दालन आणि स्थायी समिती सभागृहात सुरुवातीला सीसी टीव्ही बसविण्यात आले होते. त्यावर अध्यक्ष यशोधर फणसे यांनी नाराजी व्यक्त केल्यावर हे सीसी टीव्ही काढून टाकण्यात आले. सुधार समितीच्या सभागृहातही अशा प्रकारचे सीसी टीव्ही बसविण्यात आले होते; मात्र त्यावरही अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी आक्षेप घेतल्यावर ते काढून टाकण्यात आले. आता शिक्षण समिती, आरोग्य समिती, स्थापत्य समिती, बाजार व उद्यान समिती अध्यक्षांना नवी चकाचक दालने देण्यात आली आहेत; मात्र त्यांच्या दालनातही सीसी टीव्ही बसविण्यात आला आहे. त्यावरूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या व्हरांड्यात, अध्यक्षांच्या दालनामध्ये अशा प्रकारे सीसी टीव्ही लावण्याची गरजच काय आहे? हे सीसी टीव्ही काढायलाच हवे. याबाबात सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांच्याशी चर्चा करून प्रशासनाला हे कॅमरे काढून टाकण्यासाठी पत्र देण्यात येणार असल्याचे स्थापत्य समिती शहरचे अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.

Web Title: The chairman of the CC TV Watch