चैत्यभूमीवर आवश्‍यक सुविधा द्या - मुख्यमंत्री 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 एप्रिल 2018

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (ता. 14) येणाऱ्या अनुयायींना चैत्यभूमीवर संबंधित विभागांनी आवश्‍यक त्या सेवा-सुविधा द्याव्यात, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. 

मुंबई महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या सोई-सुविधांचा आढावा आज मुख्यमंत्र्यांनी घेतला. जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांना सुविधा देण्यासाठी संबंधित विभागांनी योग्य ती पावले उचलावीत. चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी; तसेच चैत्यभूमी स्मारक संरक्षण भिंतीलगत कॉंक्रीट टेट्रापॉड टाकण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी आयुक्त अजोय मेहता यांना दिले. पालिकेमार्फत पुरवण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. समन्वय समितीतर्फे नागसेन कांबळे यांनीही सेवा-सुविधांबाबतचे निवेदन वाचून दाखवले. या बैठकीला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, आमदार राज पुरोहित, मुख्य सचिव सुमीत मलिक, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आणि सदस्य; तसेच विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. 

Web Title: Chaitya Bhoomi Devendra Fadnavis mumbai