चैत्यभूमीवर उत्तम सुविधा ठेवावी - केसरकर 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 डिसेंबर 2016

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर येणाऱ्या भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयातून चांगले काम करावे, अशा सूचना वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी दिल्या. 

केसरकर यांनी आज चैत्यभूमी येथे जाऊन विविध शासकीय यंत्रणांमार्फत करण्यात येणाऱ्या कामाची पाहणी केली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांची राहण्याची आणि इतर व्यवस्था येथील सुरक्षा आणि स्वच्छतेची व्यवस्था, मंडप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना आपत्कालीन कक्षाची स्थापना केली जावी, असे सांगून केसरकर म्हणाले, की येथे येणाऱ्या भाविकांना आरोग्यविषयक सुविधाही उपलब्ध करून देण्यात याव्यात.

Web Title: chaityabhumi excellent facilities