महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमी सज्ज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी (ता. 6) दादर येथील चैत्यभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या अनुयायांना सोईसुविधा पुरवण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी तात्पुरता निवारा, पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, फिरती स्वच्छतागृहे आदी सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिल्या आहेत.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होण्यास सुरवात झाली आहे. त्यांच्या सोईसाठी महापालिकेने चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर रेल्वेस्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथे आवश्‍यक सोईसुविधा उपलब्ध केल्याची माहिती उपायुक्त नरेंद्र बरडे यांनी दिली.

चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथे शामियाना, व्हीआयपी कक्ष, चैत्यभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ आणि सूर्यवंशी सभागृह मार्ग या ठिकाणी रुग्णवाहिका व आरोग्य सेवा, एक लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा, पिण्याच्या पाण्यासाठी नळ व टॅंकर, वीजव्यवस्था, अग्निशामक दलामार्फत आवश्‍यक सेवा, चौपाटीवर सुरक्षारक्षक आणि बोटी, मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण, ग्रंथ व अन्य वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल आदी व्यवस्था करण्यात येत आहे.

Web Title: chaityabhumi ready for Mahaparinirvan din