दिव्यातही बंडखोरांचे आव्हान! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

डोंबिवली - पालिका निवडणुकीत ठाणे शहरापाठोपाठ दिव्यातही भाजपला बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे. 28 "अ'मधून भाजपचे विकास इंगळे, तर 27 "ड'मधून उदय म्हात्रे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे दिव्यातील बंड थंड करण्यात भाजप अपयशी ठरली आहे. 

डोंबिवली - पालिका निवडणुकीत ठाणे शहरापाठोपाठ दिव्यातही भाजपला बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे. 28 "अ'मधून भाजपचे विकास इंगळे, तर 27 "ड'मधून उदय म्हात्रे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे दिव्यातील बंड थंड करण्यात भाजप अपयशी ठरली आहे. 

भाजपचे उमेदवार आदेश भगत सुरुवातीला वेगळ्या प्रभागामधून उभे राहणार होते; मात्र ऐनवेळी त्यांनी 27 "ड' प्रभाग निवडला. त्यामुळे येथील इच्छुक उमेदवार उदय म्हात्रे यांचा पत्ता भाजपने कापल्याची चर्चा दिव्याच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. 28 "अ' विकास इंगळे यांनाही भाजपने नाराज केल्याने इंगळे आणि म्हात्रे हे दोन्ही उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. 

भाजपच्या दिव्यातील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मला उमेदवारीचे आश्वासन दिले. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. उमेदवारीबाबत शेवटपर्यंत झुलवत ठेवले. त्यानंतर भाडोत्री आणि ग्रामस्थ असा भेद करत उमेदवारी नाकारल्याचा आरोप इंगळे यांनी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श भाजपने ठेवावा, यासाठी मुख्यमंत्र्यांना दिव्यातल्या जाहीरसभेत त्यांची प्रतिमा भेट दिली, असा खुलासाही त्यांनी "सकाळ'शी बोलताना केला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारच्या (ता. 11) दिव्यातील जाहीरसभेत इंगळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा व्यासपीठावर भेट म्हणून दिली होती. इंगळे यांची व्यासपीठावरील उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. इंगळे नेमके भाजपचे की अपक्ष उमेदवार आहेत, असा सवालही उपस्थित झाला होता. 

दमदाटीचा आरोप 
मुख्यमंत्र्यांची शनिवारी भेट घेतल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून ठार मारण्याची धमकी दिली जात आहेत. निवडणूक होईपर्यंत गावात दिसायचे नाही, असे धमकावून दबाव टाकला जात असल्याचा दावाही इंगळे यांनी केला आहे. लोकशाहीच्या मार्गाने माझी लढाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

उमेदवारीबाबतचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेत नाही. पक्षश्रेष्ठी ठरवतात तो निर्णय अंतिम असतो. सक्षम उमेदवार असेल त्यांनाच उमेदवारी दिली जाते. इंगळे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. 
- आदेश भगत, भाजप नेते

Web Title: Challenge the rebels