येत्या आठ दिवसांत काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार राजीनामे देणार : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

मुख्यमंत्री पदाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे या तिघांचे ठरले आहे. काय ठरले आहे हे या तिघांनाच माहीत असून आपल्या कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी शिवसेना आणि भाजप या पदावर दावा करत आहे.

सोलापूर : विधानसभेनंतर मुख्यमंत्री कोणाचा? या प्रश्नावर बोलताना चंद्रकांत दादा पाटील म्हणाले मुख्यमंत्री पदाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे या तिघांचे ठरले आहे. काय ठरले आहे हे या तिघांनाच माहीत असून आपल्या कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी शिवसेना आणि भाजप या पदावर दावा करत आहे.

तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष झालात म्हणजे मुख्यमंत्रीपदावरचा दावा संपला  का? असा प्रश्न भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत यांना विचारला असता ते म्हणाले आपण काम करत राहायचं पदही अनपेक्षितपणे मिळतात. मुख्यमंत्रिपदाचा मी कधीही दावा केला नसल्याचे महसूल मंत्री पाटील यांनी सांगितले.

सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर महसूलमंत्री पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. आगामी निवडणुकीत युतीच्या 220 जागांवर  विजय होइल असा पुनरुच्चारही त्यांनी केला. 

काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान आमदार भाजप, शिवसेनेमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. येत्या आठ ते दहा दिवसात अनेक इच्छुक आमदार राजीनामा देऊन प्रवेश करतील अशी माहितीही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil speaks about CM post in Solapur