चंद्रशेखर शर्मा यांना डॉ.आंबेडकर नोबल पुरस्कार प्रदान

दिनेश चिलप मराठे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

मुंबई : दक्षिण मुंबईतील खेतवाडी येथील सामाजिक क्षेत्रात गेल्या पंधरा वर्षांपासून कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर शर्मा यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नोबल पुरस्कार - 2018 देऊन गौरविण्यात आले.

मुंबई : दक्षिण मुंबईतील खेतवाडी येथील सामाजिक क्षेत्रात गेल्या पंधरा वर्षांपासून कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर शर्मा यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नोबल पुरस्कार - 2018 देऊन गौरविण्यात आले.

जुहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित पुरस्कार समारंभात चंद्रशेखर शर्मा यांना सन्मानीत करण्यात आले. देशातील 29 राज्यात कार्यरत असणाऱ्या आणि मुंबईत मुख्यालय असणाऱ्या "इंटरनॅशनल ह्यूमनराइट्स काउंसिल" या संस्थेने हा पुरस्कार प्रदान केला. या प्रसंगी पद्मश्री डॉ.विजय शाह, प्रो.मेहेर मास्टर मुस, मुंबई विद्यापीठाचे माजी उपकुलगुरु डॉ. चंद्रकृष्णमूर्ती आणि डॉ.सन्नी शाह, मरीन रंगनेट (फ्रांस काउंसलेटच्या प्रतिनिधी), गायक सुदेश भोसले, चित्रपट तारका रिमी सेन, मनीषा केलकर, खुशी मल्होत्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर शर्मा हे मागील काही वर्षे असाध्य अश्या एड्स आजाराने ग्रस्त असलेल्या वारांगणांच्या औषधोपचार आणि अन्न प्राप्तीसाठी प्रयत्न करीत भरीव मदत मिळवून देण्याचे कार्य करीत आहेत. प्रसिद्धि पासून अलिप्त राहणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे त्यात शर्मा यांचा उल्लेख होतो.

पुरस्कार प्राप्ती नंतर त्यांनी म्हटले की, आपण जोपर्यंत जीवंत आहोत तो पर्यंत चांगले काम करीत राहावे. आपला आदर्श पुढील पीढीसमोर ठेवावा. पैसा कमविताना आपल्या उत्पन्नातील एक हिस्सा हा रांजल्या गांजल्यांकरीता असतो हेच आज लोक विसरले आहेत. माझे आदर्श छ.शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, सुभाषचन्द्र बोस, संत गाडगे बाबा, बाबा आमटे, मदर टेरेसा आणि डॉ.अब्दुल कलाम आझाद आहेत. त्यांच्या समान संस्कार आपल्या भावी पिढीवर व्हायला हवेत.आपली मुले त्यातही विशेषतः मुलींच्या सबलीकरणासाठी, जन्मदर उंचावण्यासाठी कौटुंबिक पातळीवर खासे प्रयत्न व्हायला हवेत. स्त्री सुरक्षा, आरोग्य,शिक्षण आणि नोकरी- स्वयंरोजगार यांनाही प्राधान्य द्यायला हवे आहे.

देशात स्त्री भ्रूण हत्या, स्त्री-बाल लैंगिक अत्याचारा विरोधात आंदोलन आणि जनजागृतीसाठी माझा विशेष प्रयत्न राहील. जगात सर्व मुली, महिला, माता सुरक्षित आणि आनंदात असाव्यात या करिता आणखी प्रयत्न व्हायला हवेत असेही शर्मा पुढे म्हणाले. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल विभागातील मान्यवरांनी, जनतेने आणि समाजिक संस्थानी आनंद व्यक्त केला.

Web Title: chandrashekhar sharma awarded as a ambedkar Nobel award