जवान चंदू चव्हाण लवकरच परत येईल- भामरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी आम्ही पाकिस्तानच्या डीजीएमओ 15 ते 20 वेळा चर्चा केली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या चर्चेत सकारात्मक बोलणी झाली असून, त्यांनी चंदूची चौकशी पूर्ण झाल्याचे सांगितले.

मुंबई - नजरचुकीने पाकिस्तानच्या हद्दीत गेलेला भारतीय जवान चंदू चव्हाण हा लवकरच भारतात परत येईल. त्याच्या सूटकेसाठी सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे, संरक्षण राज्यमंत्री सूभाष भामरे यांनी आज (गुरुवार) सांगितले.

सुभाष भामरे यांच्या हस्ते आज खंडेरी या पाणबुडीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना भामरे यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या चंदू चव्हाणच्या सुटकेबाबत माहिती दिली. चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी सरकारकडून प्रयत्न सुरु असून, पाकिस्तानच्या लष्कराशी बोलणी सुरु आहेत.

याविषयी बोलताना भामरे म्हणाले, की चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी आम्ही पाकिस्तानच्या डीजीएमओ 15 ते 20 वेळा चर्चा केली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या चर्चेत सकारात्मक बोलणी झाली असून, त्यांनी चंदूची चौकशी पूर्ण झाल्याचे सांगितले. तसेच लवकरच त्याची सुटका करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे तो लवकरच भारतात परत येईल.

Web Title: Chandu Chavan crossed LoC inadvertently is alive & they will soon release, syas MoS Defence Subhash Bhamre