esakal | पालघर जिल्हा परिषद निवडणूक पराभवानंतर काँग्रेसमध्ये बदल
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पालघर जिल्हा परिषद निवडणूक पराभवानंतर काँग्रेसमध्ये बदल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विरार : पालघर (Palghar) जिल्हा परिषदेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा पुरता सुफडासाफ झाला असून, सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाने तत्काळ संघटनात्मक फेरबदल करीत विद्यमान अध्यक्ष दिवाकर पाटील यांना पदावरून हटवले असून, त्यांच्या जागेवर प्रफुल्ल पाटील यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

एकेकाळी ठाणे आणि पालघरवर राज्य करणारा काँग्रेस पक्ष जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर अत्यंत कमकुवत बनला आहे. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या जिल्ह्यात आता अस्तित्वच शिल्लक राहते की नाही, अशी स्थिती आहे. जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाले. त्यामुळे पालघर जिल्हा काँग्रेसमध्ये फेरबदल होण्याची दाट शक्यता होती. त्यानुसार पक्ष नेतृत्वाने जिल्हाध्यक्षपदी प्रफुल्ल पाटील यांच्या नावाची घोषणा केली. पाटील हे वाडा तालुक्यातील देवघर गावाचे रहिवासी असून, सरपंच ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

हेही वाचा: ऑलिंपिक पदकाने बदललं गावाचे नशीब..!!;पाहा व्हिडिओ

देवघर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून सर्वांत तरुण सरपंच म्हणून त्यांची ओळख होती. त्यानंतर कुणबी सेना या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून वाडा पंचायत समितीचे उपसभापतिपदही त्यांनी भूषविले, तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, कुणबी सेनेचे जिल्हाध्यक्षपदासह विविध पदांवर त्यांनी काम केले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर कुणबी सेनेच्या माध्यमातून झालेल्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. एक शेतकरी आंदोलकासोबत प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे.

हेही वाचा: पराभवाची जबाबदारी नेतृत्वाने स्वीकारावी : खडसे

पक्ष नेतृत्वाने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती पाहता सर्वांत अगोदर संघटनात्मक बांधणीवर अधिक लक्ष केंद्रित करून जिल्ह्यात काँग्रेस पक्ष क्रमांक एकचा पक्ष करण्याचे मोठे आव्हान आहे. केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात आणि सामान्य जनतेच्या प्रश्नावर लढून काँग्रेस पक्ष जिल्ह्यात उभा करू.
- प्रफुल्ल पाटील, पालघर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

loading image
go to top