सिगारेट, तंबाखू विक्रेत्यांवर छापेसत्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

नवी मुंबई - राज्यात सुरू असलेल्या ‘तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियाना’च्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी नवी मुंबई पोलिसांनी वाशी परिसरात सुरू केलेल्या छापासत्रात आठ दुकानांवर कारवाई केली. तेथे सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदा विक्री केली जात होती. दिल्लीतील संबंध हेल्थ फाऊंडेशन, अंमली पदार्थविरोधी पथक व नवी मुंबई पालिकेच्या पथकांच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी पोलिसांनी पालिकेकडे केली आहे. 

रस्त्यांवर, शाळा, रुग्णालये आणि उद्यानांसारख्या सार्वजनिक ठिकाणी सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांना बंदी आहे. परवान्याशिवाय नशेचे पदार्थ विकण्यावरही बंदी आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे बाजारात बिनधास्तपणे सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात असून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून नियम धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे सरकारने ‘तंबाखूमुक्त महाराष्ट्र’ मोहीम सुरू केली आहे. 

तंबाखूजन्य पदार्थ व सिगारेटच्या अवैध विक्रीबाबत पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात पालिकेने दिलेल्या परवान्याचा गैरवापर केल्याचे आढळले आहे. त्यामुळे अशा दुकानदारांचे व्यवसाय व गुमास्ता परवाने रद्द करण्यासाठी नवी मुंबई पोलिस महापालिकेला पत्र पाठवणार आहेत.
- अजयकुमार लांडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाशी

Web Title: Chapters on Cigarette Tobacco Vendors