रेक्टर संतोष देशपांडेवर अट्रोसिटी दाखल करा - विद्यार्थी भारती संघटना

दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 12 जुलै 2018

मुंबादेवी : पंढरपुर येथील मुलींच्या वसतिगृहातील 7 मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारा विरुद्ध विद्यार्थी भारती संघटनेने  निषेध नोंदविला आहे. या प्रकरणातील दोषी रेक्टरला अटक व्हावी आणि अट्रोसिटी दाखल करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थी भारती संघटनेने केली आहे. मुलींच्या वसतिगृहात पुरुष रेक्टर नियुक्त करणाऱ्या प्रशासनाचे डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत विद्यार्थी भारती संघटनेच्या राज्यध्यक्षा मंजिरी धुरी यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा
दिला आहे.

पंढरपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतिगृहात समाज कल्याण खात्याच्या हलगर्जीपणामुळे लैंगिक अत्याचारांसारख्या भयावह घटनेला सामोरे जावे लागले आहे.वसतीगृहातील अधीक्षक संतोष देशपांडे या नराधमाने गृहातील 7 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

यासंदर्भात विद्यार्थी भारती संघटनेने पंढरपूर येथील मुलींच्या वसतिगृहासमोर सदर घटनेचा निषेध नोंदवत पंढरपूर येथील पोलिस निरीक्षक यांना संदर्भात निवेदन दिले. 
तसेच संतोष देशपांडे या नराधमाला कठोर शिक्षा करण्यात यावी असे संघटनेचे राज्य सचिव जितेश पाटील यांनी सांगितले आहे. देशपांडेची सारी संपत्ती जप्त होऊन ती पीडित मुलींना देण्यात यावी अशी मागणी संघटनेचे राज्य प्रवक्ता अर्जुन बनसोडे यांनी म्हटले आहे.

वसतीगृहाचा दर्जा अत्यंत खालावलेला असून, कोणत्याही सोयी-सुविधा योग्य प्रकारे मिळत नसल्याचे संघटनेचे राज्य कार्यवाह श्रेया निकाळजे यांनी मुलींना धीर देत त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या कडून समजल्याचे म्हटले आहे. मुलींच्या वसतिगृहात पुरुष वोर्डन कसा ठेऊ शकतात असा सवाल संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय वाघमारे यांनी म्हटले आहे. तर लवकरात लवकर समाज कल्याण खात्याने पंढरपूरच नव्हे तर संपूर्ण राज्यातील मुलींच्या वसतिगृहात महिला अधीक्षकांचीच नेमणूक असायला हवी अशा शब्दात संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष मंथन घरत यांनी खडेबोल सुनावले आहेत. याबबतीत शासन देखील मूग गिळून बसले आहे.

वस्तीगृहाला भेट दिल्यानंतर वसतिगृहात पोषक आहार नीट वेळेवर दिला जात नाही. तसेच गेले कित्येक दिवस भत्ता देखील मुलींना देण्यात आलेला नसून, एक्सपायार्ड झालेले पदार्थ आहारात वापरले जात आहेत. अशा समस्या संघटनेचे राज्य कार्यवाह श्रेया निकाळजे यांच्या निदर्शनास आल्याचे संघटनेचे राज्य संघटक शुभम राऊत यांनी सांगितले.

Web Title: charge Atrocity on Rector Santosh Deshpande - Student Bharti Organization