गुंड प्रसाद पुजारीवर आरोपपत्र दाखल 

गुंड प्रसाद पुजारीवर आरोपपत्र दाखल 

मुंबई - कुख्यात गुंड रवी पुजारी याचा भाऊ प्रसाद पुजारी आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने नुकतेच आरोपपत्र दाखल केले. हे आरोपपत्र 570 पानी असून, पोलिसांनी 12 जणांचे जबाब नोंदविले आहेत. प्रसाद पुजारी पोलिसांच्या हाती लागला नसून, त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. 

दक्षिण मुंबईतील दोन व्यावसायिकांची 2004 मध्ये ओळख झाली; त्यानंतर ते भागीदार झाले. त्यांच्यात आर्थिक व्यवहारावरून झालेला वाद पोलिसांत गेला आहे. आपल्याला येणे असलेले 12 कोटी रुपये देण्यास भागीदार टाळाटाळ करत असल्याची तक्रार एका व्यावसायिकाने पोलिसांत केली होती. याबाबत तपास सुरू असताना देणेकरी व्यावसायिकाला प्रसाद पुजारीच्या नावाने धमकीचे दूरध्वनी येऊ लागले. 

या प्रकरणी संबंधित व्यावसायिकाने पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली. त्याच्या भागीदाराने येणे वसूल करण्यासाठी पुजारी टोळीला सुपारी दिल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले. प्रसाद पुजारी आणि त्याला सुपारी देणाऱ्या व्यावसायिकांच्या मोबाईल "सीडीआर'ची माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com