शहरात चार्जिंग स्टेशन उभारले जाणार

शहरात चार्जिंग स्टेशन उभारले जाणार
शहरात चार्जिंग स्टेशन उभारले जाणार

नवी मुंबई : पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन मिळावे, इलेक्‍ट्रिक वाहनांच्या वापरात वाढ व्हावी, याकरीता महापालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीएनजी पंपाप्रमाणे चार्जिंग पंप तयार करण्याचे महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या विचाराधीन आहे. मात्र, सध्या महापालिका प्राथमिक स्तरावर याबाबत अभ्यास करीत आहे.

केंद्र सरकारच्या अवजड उद्योग खात्यामार्फत देशभरात फेम-१ व फेम-२ ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारने महापालिकेला ३० इलेक्‍ट्रिक बस उपलब्ध करून दिल्या आहेत. यातील काही बसेस सध्या एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून, प्रवाशी सेवाही सुरू झाली आहे.  या बस चार्जिंग करण्यासाठी घणसोली व तुर्भे आगारात व्यवस्था करण्यात आली आहे. लवकर एनएमएमटीच्या इतर बस डेपोमध्येही हे चार्गिंज स्टेशन उभारण्यात येणार आहेत. एक बस चार्ज करण्यासाठी २ ते ३ तासांचा अवधी लागतो. अनेकदा वाहन चार्जिंग करण्याचे साधन नसल्यामुळे व महागडे वाहन असल्यामुळे इलेक्‍ट्रिक वाहनांकडे ग्राहक पाठ फिरवतात. मात्र, शहरात महत्त्वांच्या जागांवर चार्जिंग स्टेशन उभारल्यास इलेक्‍ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होईल, अशी पालिकेला अपेक्षा आहे.

मोजकेच चार्जिंग स्टेशन
महापालिकेने तळमजल्यावरील वाहनतळाच्या ठिकाणी वाहन चार्जिंगकरीता सोय केली आहे. महापालिकेप्रमाणे सिवूड्‌समधील ग्रॅण्ड सेंट्रल मॉलमध्येही इलेक्‍ट्रिक वाहन चार्ज करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

नवी मुंबई शहर हे २१ व्या शतकातील स्मार्ट सिटी आहे. या शहराच्या भविष्यातील अडचणी लक्षात घेऊन इलेक्‍ट्रिक बस आपण सुरू केल्या आहेत. मात्र, नागरिकांनीही इलेक्‍ट्रिक वाहनांचा वापर करावा, याकरीता चार्जिंग स्टेशन उभारण्याचे विचाराधीन आहे. 
-अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com