घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळले, एक मृत्यूमुखी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

प्रथम हा आवाज नक्की कुठून आला हे नागरिकांना कळत नव्हते. सर्वोदय रूग्णालयाशेजारील काम चालू असलेल्या जागृती इमारतीवर हे विमान कोसळले. या घटनेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे कळते. हे विमान या पादचाऱ्यासह इमारतीत शिरले असल्याची माहिती कळते.  

मुंबई: घाटकोपर मधील सर्वोदय रूग्णालयाजवळ चार्टर्ड विमान कोसळल्याने मोठा आवाज झाला, त्यामुळे  परिसरात आगीचे लोट पसरले आहेत. आचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

प्रथम हा आवाज नक्की कुठून आला हे नागरिकांना कळत नव्हते. सर्वोदय रूग्णालयाशेजारील काम चालू असलेल्या जागृती इमारतीवर हे विमान कोसळले. या घटनेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे कळते. हे विमान या पादचाऱ्यासह इमारतीत शिरले असल्याची माहिती कळते.  

अग्निशामन दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे काम सुरू असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. 

Web Title: chartered plane crashes in ghatkopar mumbai 1 dies

टॅग्स