चव्हाण मुक्त विद्यापीठात चित्रपटविषयी अभ्यासक्रम

Open-University
Open-University

ठाणे - चित्रपटविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास कमी शुल्कात विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम शिकता येणार आहे, असे मराठी चित्रपट दिग्दर्शक विजू माने यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे या अभ्यासक्रमाविषयी माहिती देण्यासाठी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना माने म्हणाले, ""गेल्या आठ वर्षांपासून मी चित्रपटविषयक पदवी अभ्यासक्रमावर काम करीत होतो. मुंबई-ठाणेमध्ये चित्रपट अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्था कमी आहेत. असलेल्या संस्थांचे वार्षिक शुल्कही आवाक्‍याबाहेर आहे. तरुण होतकरू कलाकारांना चित्रपट क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. मात्र, त्यांना व्यासपीठ मिळत नाही. अशा होतकरू कलाकारांना या अभ्यासक्रमाद्वारे व्यासपीठ देण्यात येईल.
""अभ्यासक्रमाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शिकवण्यासाठी या क्षेत्रातील दिग्गज कलाकार तज्ज्ञांची नेमणूक करण्यात येईल,'' असे माने यांनी सांगितले. या वेळी अभिनेता कुशल बद्रिकेही उपस्थित होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com