परदेशात नोकरीच्या प्रलोभनाने 156 जणांची फसवणूक

Cheating-Crime
Cheating-Crime

मुंबई - परदेशात नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रियंका प्रज्योत गडकर (वय 40) हिला नागपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली. आतापर्यंत 156 तक्रारदार पुढे आले आहेत. त्यांच्याकडून 40 लाख 81 हजार रुपये घेण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

प्रियंका गडकर ही ग्रॅंट रोड येथील रहिवासी आहे. फसवणूक झालेले बहुतेक जण उत्तर प्रदेश व बिहार येथील आहेत. प्लंबर, हेल्पर, फिटर आदी नोकऱ्या देण्याचे सांगून त्यांच्याकडून 50 हजार ते एक लाखापर्यंतची रक्कम घेण्यात आली होती. मूळचा उत्तर प्रदेशातील असलेला मोहम्मद दिलशाद मिराज अहमद राईन (वय 27) याने याबाबत तक्रार केली होती. अझरबैजानमध्ये पाठविण्यासाठी गडकरने त्याच्याकडून 55 हजार रुपये मागितले होते. पण, त्याचा व्हिसा काही कारणाने रद्द झाल्याचे त्याला समजले.

गडतरने आतापर्यंत 156 तक्रारदारांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com