तेलाच्या नावाखाली विकले 30 लाखांचे पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

मुंबई - कपड्यांच्या व्यापाऱ्याला वाढीव नफ्याचे प्रलोभन दाखवून तेलाऐवजी 30 लाखांचे पाणी विकणाऱ्या नायजेरियन नागरिकासह दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

मुंबई - कपड्यांच्या व्यापाऱ्याला वाढीव नफ्याचे प्रलोभन दाखवून तेलाऐवजी 30 लाखांचे पाणी विकणाऱ्या नायजेरियन नागरिकासह दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

तक्रारदार ईश्‍वर रामाणी यांचा कपड्यांचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. इंग्लंडमध्ये कॉस्मेटिक ऑईलला मोठी मागणी असते. भारतात त्याची किंमत कमी आहे. त्याची भारतात खरेदी करून इंग्लंडमधील कंपनीला विकल्यास दलालीच्या स्वरूपात मोठी रक्कम मिळेल, असे प्रलोभन त्या व्यक्तीने दाखवले. रामाणी यांनी नमुना स्वरूपात तेल घेऊन तपासणीसाठी नायजेरियन नागरिकाला दिले. तेलाचे नमुने पसंतीला उतरले असून कंपनीने 30 लिटर तेल पाठवल्याचा ई-मेल काही तासांतच त्याने रामाणी यांना पाठवला. त्यानुसार रामाणी यांनी संबंधित कंपनीला तेलासाठी 30 लाख रुपये दिले. तथापि संशय आल्यामुळे रामाणी यांनी कॅन फोडल्यानंतर त्यात पाणी असल्याचे आढळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

पैसे घेण्यासाठी आलेल्या हेन्‍री उझोचुक्वू म्बेग्वू या नायजेरियन नागरिकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीवरून एका भारतीय तरुणालाही पोलिसांनी अटक केली.

Web Title: Cheating Crime