नौदलात नोकरीच्या नावाने फसवणूक करणारा अटकेत

Crime
Crime

मुंबई - नौदलामध्ये नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवत सहा जणांची तब्बल ३६ लाखांची फसवणूक करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी अटक केली. इमान्ड्री त्रिनादी असे त्याचे नाव असून ते लष्कराचा माजी अधिकारी असल्याचे भासवत होता. त्रिनेत्राने विशाखापट्टणम येथे सरस्वती डिफेन्स अकादमी सुरू केली होती. अकादमीच्या माध्यमातून त्याने तरुणांना नौदलात नोकरीचे प्रलोभन दिले होते. 

त्रिनादी हा लष्करातून निवृत्त झाल्यानंतर २००१ पासून त्याने विशाखापट्टणम येथे सरस्वती अकादमी सुरू केली होती. अकादमीत प्रवेश घेतल्यास एका वर्षात भारतीय संरक्षण दलात भर्ती करतो, असे त्रिनादी सांगायचा. विश्‍वास बसावा म्हणून उमेदवार भरती झाल्यावरच पैसे द्या, अशा भूलथापा मारायचा. याच भूलथापांना सहा तरुण बळी पडले. दहावी पास असलेल्या उमेदवारांची त्रिनादीने बनावट ऑनलाईन परीक्षा घेतली होती. त्यानंतर त्रिनेदाने बनावट नियुक्ती पत्रे उमेदवारांना दिल्ली येथून पाठवली. नोकरीकरता त्याने प्रत्येकी उमेदवारांकडून सहा लाख रुपये घेतले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com