भूतबाधा झाल्याचे सांगून पैसे, दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

मुंबई - आजारी मुलीला भूतबाधा झाल्याचे सांगून मांत्रिकाने लिंबूविक्रेत्याच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने लुटून नेल्याचा प्रकार जवळ जवळ एक वर्षानंतर उघडकीस आला आहे. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, सूरज नावाच्या मांत्रिकाचा शोध सुरू केला आहे

कफ परेड येथील शिवशक्तीनगर परिसरात राहणारे रामअवध जैसवार यांचा लिंबूविक्रीचा व्यवसाय आहे. मे 2018 मध्ये त्यांच्या मुलीला ताप आला होता. मच्छीमार नगर परिसरातील दवाखाना बंद असल्याने तिने परिसरात विचारपूस केली त्या वेळी कथित मांत्रिक सूरज तिथे होता.

मुलीला भूतबाधा झाल्याचे त्याने सांगितले. भूतबाधा न उतरवल्यास आठ दिवसांत मुलीचा मृत्यू होईल, अशी भीती त्याने घातली. 20 मे रोजी जैसवार यांच्या घरी गेल्यानंतर सूरजने पैसे आणि मौल्यवान दागिन्यांना झालेली भूतबाधा उतरवून देतो, असे सांगत त्याने कपाटातील मडक्‍यातून दागिने आणि पैसे काढून घेतले व तो पसार झाला. पोलिसांनी या मांत्रिकावर अंधश्रद्धा कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Cheating Loot Crime