घर देण्याचे आमिष 1.36 कोटींची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसनाअंतर्गत लोअर परळ येथील इमारतीत खोल्या देण्याचे आमिष दाखवून एक कोटी 36 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाला नुकतीच अटक केली. तक्रारदारांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी या बांधकाम व्यावसायिकाने एसआरए प्राधिकरणाचे बनावट "ना हरकत' प्रमाणपत्र दाखवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी 13 तक्रारदार पुढे आले आहेत.

तक्रारीनुसार, 2008 मध्ये आरोपी बांधकाम व्यावसायिकाने लोअर परळ येथील एका "झोपु' प्रकल्पात 300 चौरस फुटांचे घर देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर त्यांच्याकडून रोख व धनादेशाद्वारे पैसे घेतले; मात्र त्यांना घर दिले नाही. तक्रारदारांनी याप्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Web Title: cheating in mumbai