थंडपेय विक्रेत्यांकडील बर्फाची तपासणी होणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

मुंबई - रस्त्यावरील सरबत, बर्फाचा गोळा विकणाऱ्या गाड्या व ज्यूस सेंटरवर वापरण्यात येणाऱ्या; तसेच कारखान्यातील बर्फाच्या नमुन्यांची तपासणी करण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) घेतला आहे. 

मुंबई - रस्त्यावरील सरबत, बर्फाचा गोळा विकणाऱ्या गाड्या व ज्यूस सेंटरवर वापरण्यात येणाऱ्या; तसेच कारखान्यातील बर्फाच्या नमुन्यांची तपासणी करण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) घेतला आहे. 

उन्हापासून दिलासा देणारा हा बर्फ नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरण्याची शक्‍यता असते. शहरातील बहुतांश बर्फविक्रेते, व्यावसायिक, रसवंतिगृहे, शीतपेयगृहे, सरबत, आईस्क्रीम आणि हातगाडीवर बर्फाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हा बर्फ स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाण्यापासून तयार केला जात नाही. तो आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्‍यता असल्याने विक्रेत्यांकडील बर्फाची तपासणी करण्याचे "एफडीए'ने ठरवले आहे. त्याचबरोबर बर्फाच्या कारखान्यातूनही तपासणीसाठी नमुने घेण्यात येणार असल्याचे "एफडीए'च्या अधिकाऱ्याने सांगितले. दर वर्षी बर्फ व खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन त्याची तपासणी करण्याची धडक मोहीम "एफडीए'तर्फे राबवण्यात येते. यंदा मे महिन्यापासून "एफडीए'कडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. यासाठी "एफडीए'च्या अधिकाऱ्यांची पथके तयार करण्यात येणार आहेत. 

Web Title: Checking of ice