छेडा यांची उमेदवारी महेतांसाठी कसोटीची 

विष्णू सोनवणे - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

मुंबई - महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांना काँग्रेसने प्रभाग क्रमांक १३२ मधून उमेदवारी दिली आहे. त्यांची उमेदवारी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यासाठी अडचणीची ठरली आहे. छेडा आणि महेता दोघांसाठीही यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. छेडा यांना भाजपला कडवे आव्हान द्यावे लागणार आहे. दुसरीकडे महेता यांचे निकटवर्ती भाजपचे उमेदवार पराग शहा त्यांच्याविरोधात आहेत.

विद्याविहारमधील किरोळ व्हिलेज या जुन्या १२४ प्रभागातून छेडा हे नगरसेवक म्हणून गेल्या निवडणुकीत निवडून आले होते. त्यापूर्वी ते घाटकोपर पश्‍चिमेतील भीमनगर रामनगरमधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. आता गरोडियानगर या १३२ प्रभाग क्रमांकातून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. सलग तीन निवडणुका लढवून ते निवडून आले आहेत. यावेळी ते नव्या मतदारसंघात नशीब आजमावत आहेत. येथे भाजपचे उमेदवार पराग शहा यांच्याशी त्यांना झुंज द्यावी लागणार आहे. शहा हे बिल्डर असल्याचे समजते. मंत्री प्रकाश महेता यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असून त्यामुळेच त्यांना उमेदवारी मिळाल्याचे बोलले जात आहे. येथे गुजराती मतदारांचे प्रमाण अधिक असून छेडा आणि महेता यांच्यामुळे गुजराती मतांचे विभाजन अटळ आहे. स्थानिकांना डावलून छेडा यांना उमेदवारी दिल्याने तेथील काँग्रेसच्या महिला ब्लॉक अध्यक्षा मनीषा सूर्यवंशी नाराज असल्याचे समजते.

प्रकाश महेता घाटकोपरच्या पूर्व भागातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे या भागात त्यांची मोठी ताकद आहे. परिणामी घाटकोपरमधील भाजपचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. छेडा हे विरोधी पक्षनेते असल्याने काँग्रेससाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. छेडा हे स्थानिक उमेदवार नसल्याने स्थानिकांच्या नाराजीला ते कसे सामोरे जातात यात त्यांची कसोटी आहे. छेडा यांनी या नव्या मतदारसंघात नवा डाव मांडला असून तेथे त्यांनी महेता यांनाच अप्रत्यक्षपणे आव्हान निर्माण केले आहे.

Web Title: cheeda & mehata Elections to the prestigious