ई-मेल हॅक करून कंपनीची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

मुंबई - केमिकल कंपनीचा ई-मेल हॅक करून साडेपाच लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रोळी येथील जितेंद्र सहदेव सावंत (वय 38) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. ते ऋतिक केमिकल्स प्रा.लि. या कंपनीत काम करतात. तक्रारीनुसार कंपनीचा ई-मेल हॅक करून अनोळखी व्यक्तींनी समीर एजन्सीला बनावट ई-मेलद्वारे संपर्क साधला. त्याच्या साह्याने व्यवहारातील पाच लाख 27 हजारांची रक्कम स्वतःच्या खात्यावर वळती केली. 

Web Title: Chemical Company Email Hack