पनवेल : एक्स्प्रेस वे मार्गावर केमिकल टँकर ३० फुट खाली पडून चालकाचा मृत्यू

Accident
AccidentSakal Media

पनवेल : पुण्याहून एक्स्प्रेस वेमार्गे (Express way) मुंबईकडे निघालेला रासायनिक टँकरवरील (chemical tanker accident) चालकाचा ताबा सुटल्याने तो रस्‍त्‍यालगतचा कठडा तोडून ३० ते ३५ फूट खोल खड्ड्यात पडला. शुक्रवारी रात्री पनवेलजवळ झालेल्या या अपघातात टँकर चालकाचा (driver death) जागीच मृत्यू झाला. टँकरचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघाताला टँकरचालक स्‍वतः जबाबदार असल्याचे आढळल्‍याने खांदेश्वर पोलिसांनी (Khandeshwar police) त्‍याच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

Accident
लॉकडाऊनकाळात 36 टक्के नागरिक कर्जबाजारी; आर्थिक सर्वेक्षण अहवालात माहिती

टँकर चालकाचे नाव अरविंद यादव असे असून तो शुक्रवारी पुणे येथून एक्स्प्रेस वे मार्गे फॉस्फरिक ॲसिडने भरलेला टँकर घेऊन मुंबईकडे निघाला होता. रात्री ९.३० च्या सुमारास पनवेलजवळ भरधाव वेगात असलेल्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो रस्त्याच्या बाजूला असलेला कठडा तोडून ३० ते ३५ फूट खोल खड्ड्यात पडला.

गंभीर जखमी झालेला चालक अरविंद यादव टँकरच्या केबिनमध्ये अडकून पडला होता. अपघाताची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com