कोर्टात जाताना भुजबळांची तब्येत बिघडली, जसलोकमध्ये दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

डॉक्टर मेहता हे छगन भुजबळ यांच्यावर उपचार करत आहेत. भुजबळ यांना श्वास घ्यायलाही त्रास होतो आहे.

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ हे कोर्टात सुनावणीसाठी जात असताना त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना छातीत दुखत असल्याची माहिती मिळते. डॉक्टर मेहता हे छगन भुजबळ यांच्यावर उपचार करत आहेत. भुजबळ यांना श्वास घ्यायलाही त्रास होतो आहे. आवश्यक वाटल्यास त्यांना अन्य रुग्णालयातही हलवण्यात येऊ शकते, अशीही माहिती देण्यात येत आहे.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Chhagan Bhujbal is admitted in Jaslok Hospital mumbai