छगन भुजबळ आज नाशिकमध्ये

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 जून 2018

मुंबई - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ हे गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीनंतर गुरुवारी (ता. 14) नाशिक शहरात दाखल होत आहेत. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे.

छगन भुजबळ व समीर भुजबळ यांच्या नाशिक दौऱ्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले आहे. भुजबळ यांचे शहरात विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.

Web Title: chhagan bhujbal in nashik