छगन भुजबळांवर ऍन्जिओप्लास्टीची गरज 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

मुंबई - छगन भुजबळ यांच्या हृदयाचे ठोके अनियमित असल्याने त्यांच्यावर तातडीने ऍन्जिओग्राफी आणि ऍन्जिओप्लास्टी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या संदर्भात बॉम्बे हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी. के. गोयल यांनी राज्य सरकारला पत्र दिले आहे. 

भुजबळ यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयाचे अनियमित ठोके व रक्तदाबाच्या त्रासामुळे त्यांच्या काही चाचण्या करण्याच्या सूचना "जेजे'तील डॉक्‍टरांनी केल्या होत्या. त्यानुसार त्यांची हॉल्टर नेक चाचणी, थॅलिसियम सिटी स्कॅन, इलेक्‍ट्रो फिजिऑलॉजी स्टडी या चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांच्या अहवालानुसार भुजबळांवर तातडीने ऍन्जिओग्राफी आणि ऍन्जिओप्लास्टी करण्याची आवश्‍यकता असल्याचे डॉ. गोयल यांनी सुचवले आहे. 

भुजबळांची प्रकृती स्थिर असली, तरी त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज असल्याचे डॉ. गोयल यांनी सांगितले. राज्य सरकारच्या परवानगीनंतर या शस्त्रक्रिया करण्यात येतील. भुजबळांवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhagan Bhujbal need to angioplasty