कल्याण रेल्वे स्थानकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

kalyan.
kalyan.

कल्याण - छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज आपण सुरक्षित असून, त्यांच्या जीवनावर बोलण्यास सुरुवात केल्यास वेळ कमी पडेल असे प्रतिपादन आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याणमध्ये केले.

कल्याणच्या इतिहासात पहिल्यादा कल्याण रेल्वे स्थानकामध्ये आज मंगळवार ता 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. 

तर पहिल्यांदा जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी स्टेशन परिसर दणाणून सोडले. या कार्यक्रमामध्ये आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिल्यादा जयंती साजरी केली. त्याचे कौतुक करत पवार पुढे म्हणाले की, आज आपण जे सुरक्षित आहोत ते निश्चित छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आहोत कारण त्यावेळी मोगलांनी अनेक वेळा हल्ले केले मात्र महाराजानी संयमी, गनिमी काव्याने हे हल्ले परतवून लावल्याने आजची पिढी सुरक्षित आहे. पवार पुढे म्हणाले की त्यांच्या जीवनावर बोलावे तर वेळ कमी पडेल, आपण जय भवानी, जय शिवाजी घोषणा देतो यात महिलांचा सन्मान आला आहे. त्यांनी नेहमीच महिलांचा सन्मान केला. 

मध्य रेल्वेच्या कल्याण, ठाणे, दादर अश्या अनेक रेल्वे स्थानकात पहिल्यादाच छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी स्टेशन मास्तर प्रदीपकुमार दास, स्टेशन डायरेक्टर यशवंत व्हटकर, भाजपा परिवहन समिती सदस्य कल्पेश जोशी, राहुल भोईर समवेत कल्याण रेल्वे स्थानक मधील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी वर्गाने सहभाग घेतला, यावेळी नरेंद्र पवार यांनी रेल्वे प्रवासी यांच्या समस्या जाणून मेल गाड्याच्या आरक्षित तिकीट घराला भेट देत रेल्वे प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी वर्गाशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com