उदयनराजेंविरुद्ध राजकीय कट; आम्ही राजेंसोबत- आव्हाड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा आणि कायद्याचा सन्मान करत उदयनराजे स्वतःहून पोलिस स्थानकात हजर झाले आहेत.

- जितेंद्र आव्हाड

मुंबई : "छत्रपती उदयन महाराज हे शिवरायांचे वारसदार आहेत. त्यांच्याविरुद्ध राजकीय षङयंत्र रचून त्यांना खोट्या आरोपांखाली अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत," असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज (मंगळवार) केले. 

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे स्वतःहून सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा आणि कायद्याचा सन्मान करत उदयनराजे स्वतःहून पोलिस स्थानकात हजर झाले आहेत. त्यांच्याबाबत पुढे निर्णय व्हायचा आहे. त्यांनी त्यांचं काम केलं आहे. न्यायालयात पुढील निर्णय होईल. महाराज यांच्यामागे सगळ्यात आधीपासून मी उभा आहे. पेटवा पेटवीची भाषा चुकीची आहे, असे आव्हाड यांनी सांगितले. 

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

    Web Title: chhatrapati udayanraje bhosale marathi news jitendra awhad news