छोटा राजनच्या हस्तकाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

मुंबई  - नव्वदच्या दशकातील नालासोपारानजीकच्या वडराई गावातील चांदी तस्करी प्रकरणातील आरोपी, कुख्यात गुंड छोटा राजनच्या हस्तकाला 15 वर्षांनंतर पकडण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. चंद्रकांत अण्णा पाटील ऊर्फ चरण पालकर (वय 60) असे त्याचे नाव आहे. 

1991 मध्ये वडराई येथे परदेशातून आलेले चांदीने भरलेले जहाज समुद्रातील खडकाला धडकल्याने बुडाले होते. याबाबत माहिती मिळताच गावातील नागरिकांनी जहाजातील चांदी लुटली. त्यानंतर स्थानिक संघटित टोळीने या नागरिकांना त्रास देण्यास सुरवात केली. काही रहिवाशांचा खूनही करण्यात आला. काहींना तर जिवंत पेटविण्यात आले होते. या टोळीत पाटीलचाही सहभाग होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. 1997 मध्ये जामीन मिळाल्यानंतर तो फरारी झाला. त्यानंतर तो दिल्लीतील सुभाषसिंग टोळीसोबत तो काम करत होता. काही दिवसांनी दिल्ली पोलिसांनी त्याला शस्त्रसाठ्यासह अटक केली होती. त्याच्याविरोधात टाडा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने त्याला 10 वर्षांची शिक्षा ठोठावली होती; मात्र चांदी तस्करी प्रकरणात नालासोपारा पोलिसांनी त्याचा ताबा घेतल्यानंतर तो पुन्हा जामिनावर बाहेर आला होता. नंतर तो न्यायालयात हजरच झाला नव्हता. त्यानंतर पाटील छोटा राजनच्या टोळीसाठी काम करू लागला. 

Web Title: Chhota Rajan charan palkar arrested