अस्सल देशी कोंबडीला 500 रुपये किलो भाव, यंदाच्या गटारीला कोविडची फोडणी... 

अस्सल देशी कोंबडीला 500 रुपये किलो भाव, यंदाच्या गटारीला कोविडची फोडणी... 

मुंबई : गटारी अमावस्येला यंदा कोविडची फोडणी पडली आहे. देशी कोंबडीचा दर विक्रमी 500 रुपये किलोपर्यंत पोहचला आहे. तर बॉयलर कोंबडी 160 ते 180 रुपये किलो पर्यंत मिळतेय. कोविडमुळे मागणी कमी असल्याने यंदा मुंबईत गटारीसाठी नेहमी पेक्षा निम्म्या म्हणजेच केवळ 4 लाखांपर्यंत कोंबड्या आल्या आहेत.

मुंबईत लॉकडाऊन शिथील झालेले असल्याने चिकन मटण शॉप सुरु झाले आहेत. मात्र, कोविडच्या सुरवातीच्या काळात चिकनबाबत पसरलेल्या अफवेमुळे कोबड्यांचे उत्पादन शेतकरी आणि पोल्ट्री मालकांनी कमी केले. तसेच मुंबईतूनही कमी मागणी होती.

नेहमी बॉयलर कोंबडीवर भुक भागवणारे खवय्ये गटारीला हमखास देशी कोंबडी आणि वड्यांचा बेत करतात. मात्र, यंदा देशी कोंबडीचा दर चांगलांच वाढला आहे. नेमही 400 रुपयांच्या आत असलेली देशी कोंबडीसाठी 500 रुपये मोजावे लागणार आहेत.

गटारीचा बेत WhatsApp वर 

यंदा गटारीसाठी तिखटाचा वार आला आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे नेहमी सारख्या पार्ट्या होणे शक्य नाही. तसेच बारही बंद असल्याने बाटली विरांचा हिरमोड झाला आहे. मुंबईतील सोसायट्यांनी तर गच्चीवर दरवर्षी होणारा गटारीचा बेतही रद्द केला आहे. तर मित्रनंडळींच्या घरी जाऊन गटारी करणे शक्य नसल्याने यंदा WhatsApp वरच गटारीची चर्चा सुरु आहे.

अस्सल देशी कोंबडी 500 रुपये किलो तर बॉयलर कोंबडी 140 ते 160 किलो हा शनिवारचा दर असल्याचे घाटकोपर येथील चिकन शॉप मालक संतोष बढे यांनी सांगितले. अस्सल देशी कोंबडी बरोबरच मुंबईत संकरीत देशी कोंबडीही विकली जाते. या कोंबडीच्या दरातही 10-20 रुपयांची वाढ झाली आहे.शनिवारच्या दरानुसार ही कोंबडी 280 रुपये किलोपर्यंत मिळत आहे.

कोविडच्या काळात चिकनची मागणी कमी झाली होती.त्यामुळे अनेक लहान शेतक्यांनी पोल्ट्री बंद केली. तसेच मागणी कमी असल्याने यंदा चिकन शॉपवाल्याकडून मालही कमी मागवला जात आहे. दरवर्षी गटारीला 8 लाखांपर्यंत बॉयलर कोंबड्या मुंबईत येतात. तर यंदा 4 लाखांपर्यंत कोंबड्या शनिवार संध्याकाळ पर्यंत दाखल झाल्याचे एका कोंबडी डिलरने सांगितले. 

मुंबईतील काही भागात आजही दुकाने सुरु करण्यावर निर्बंध आहेत. संध्याकाळी 5 वाजल्यानंतर अनेक भागातील दुकाने बंद होतात. त्यातच दरवर्षीपेक्षा कमी माल येण्याची शक्यता असल्याने सकाळीच चिकनचा बाजार बंद होण्याची शक्यता नाकरात येत नाही. त्यामुळे सकाळी लवकर उठून चिकन मटण शॉप बाहेर रांग लावलेली बरी. 

( संकलन - सुमित बागुल )

chicken rates this gatari are on peak due to corona virus pandemic

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com