डावे-उजवे पाहू नका! 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

मुंबई - पोलिसांनी कारवाई करताना किंवा गुन्ह्यांचा तपास करताना डावे-उजवे करू नये. गुन्हेगारांवर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गुन्हेसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी पोलिस दलाने प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त करताना कडवे हिंदुत्ववादी साधक असलेल्या संघटनांविरोधात सुरू केलेल्या पोलिस कारवाईचे त्यांनी कौतुक केले. 

महाराष्ट्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की राज्यात महिलांवरील अत्याचारांत वाढ ही चिंताजनक आहे. पोलिस दलाला अत्याधुनिक साधने तसेच सर्व सवलती दिल्या आहेत. त्यामुळे कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते कित्येक वर्षांनी आले आहे. त्यातच सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या काही साधकांकडे सापडलेला शस्त्रसाठा, अंधश्रद्धाविरोधी चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत उजव्या कार्यकर्त्यांचा असलेला सहभाग याबद्दल पुरावे सापडल्याने शांतताप्रिय हिंदू समाजात शिरलेली विषवल्ली मुख्यमंत्री फडणवीस वेळीच उखडून फेकून देणार काय, असा प्रश्‍न विचारला जात आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात हात असलेल्या माओवादी विचारवंतांना पकडण्याची कारवाईही पोलिस दलाने सुरू ठेवली आहे. फडणवीस यांनी या दोन्ही प्रकरणांत दोषींना पाठीशी घालू नका, असे सांगितले आहे. राज्यातील अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोर भूमिका स्पष्ट केली आहे. नक्षलवाद माओवाद समर्थकांच्या घरांवर पडलेल्या छाप्यांमुळे वैचारिक वातावरण पुन्हा ढवळले जाण्याची शक्‍यता आहे. 

पुणे ग्रामीण गुन्हेसिद्धी अल्प! 
दोन वर्षांत महाराष्ट्रातील पोलिस दलाच्या बहुतेक सर्व मागण्या पूर्ण झाल्या आहेत. कामाचे तास, रजांचे प्रमाण आणि आधुनिक शस्त्रे अशी अनुकूलता निर्माण झाल्याने आता कामगिरीत सुधारणा अपेक्षित असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्यात सध्या गुन्हे सिद्ध होण्याचे सरासरी प्रमाण 34 टक्‍के आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई अशा महत्त्वाच्या क्षेत्रात हे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असले तरी पुणे ग्रामीणसारख्या काही महत्त्वाच्या भागात तपास समाधानकारक शेवटाला पोहोचत नसल्याची खंत फडणवीस यांनी बोलून दाखवल्याचे समजते. 

Web Title: Chief Minister advice to police officers