उल्हासनगरला विकासनिधी देण्याचे मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन

दिनेश गोगी
शुक्रवार, 18 मे 2018

ब्रेक लागलेल्या कामांना गती मिळणार

उल्हासनगरः निधी नसल्याने उल्हासनगरच्या विकासाला ब्रेक लागला.त्यास गती मिळण्यासाठी विकासनिधी ही काळाची गरज असल्याचे साकडे आयुक्त व सत्ताधारी यांनी घातल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 350 कोटी रुपयांच्या विकासकामांची मान्यता दिली आहे.

ब्रेक लागलेल्या कामांना गती मिळणार

उल्हासनगरः निधी नसल्याने उल्हासनगरच्या विकासाला ब्रेक लागला.त्यास गती मिळण्यासाठी विकासनिधी ही काळाची गरज असल्याचे साकडे आयुक्त व सत्ताधारी यांनी घातल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 350 कोटी रुपयांच्या विकासकामांची मान्यता दिली आहे.

गुरुवारी (ता. 17) सह्याद्री अतिथीगृहात महापौर मीना आयलानी, मनपा आयुक्त गणेश पाटील, उपमहापौर जीवन इदनानी, भाजपा जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, भाजपा नेते प्रकाश माखिजा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यावळी फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना उल्हासनगरला 350 कोटी रुपये विकास निधी देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी सुधारित विकास आराखडा आणि क्लस्टर योजना लागू करण्याबाबत चर्चा झाली, घनकचरा आणि डंपिंग ग्राउंडची समस्या लक्षात घेता उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांसोबत संयुक्त प्रकल्प राबविणे, शहरातील 21 विविध रस्त्यांसाठी 37 करोड रुपयांच्या कामांना मंजुरी, उल्हासनगर शहराला उल्हासनगर, शहाड, विठ्ठलवाडी या तीन रेल्वे स्थानिकांनी वेढलेले आहे. या तिन्ही रेल्वे स्थानकांजवळ बहुमजली वाहनतळ, कमर्शियल कॉम्प्लेक्स, आणि अन्य कामांसाठी 72 कोटी, एम एम आर डी ए अंतर्गत मंजूर झालेल्या 4 रस्त्यांसाठी 49 कोटी, बोट क्लबच्या सुशोभीकरणासाठी 30 कोटी, विद्युत अभियांत्रिकी कामासाठी 8 कोटी याशिवाय अमृत योजने अंतर्गत भुयारी गटार, शहरातील 64 उद्याने यांच्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना तत्वांना मान्यता देण्यात आली आहे.

महापौर मीना आयलानी, आयुक्त गणेश पाटील यांनी पत्रकारपरिषदेत आज दुपारी माहिती दिली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, उपमहापौर जीवन ईदनानी, सभागृहनेता नेता जमनू पुरुसवानी, नगरसेवक मनोज लासी, भाजपा नेते प्रकाश माखिजा, सभापती सोनू छापरू उपस्थित होते.

Web Title: Chief Minister assured Ulhasnagar development fund