मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा 'वर्षा' डिफाॅल्टर

fadnavis
fadnavis

मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन तीन महिन्यापेक्षा जास्त पाण्याची थकबाकी ठेवली, तर महानगरपालिका  तातडीने जलजोडणी खंडित करते. परंतु मुंबई महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासांची कोट्यवधी रूपयांची पाणी थकबाकी ठेवूनही कारवाई करत नाही.
मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासावर पाण्याच्या एकूण 8 कोटींची थकबाकी आहे. सदर बंगल्याला मुंबई पालिकेने डिफॉलटर यादीत टाकले आहे.

माहिती अधिकार  कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेकडून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती मागावली होती. सदर माहिती संदर्भात जन माहिती अधिकरी तथा कार्यकारी अभियंता जलमापके (महसूल) यांनी शकील अहमद शेख यांस माहिती दिली आहे. 
या माहितीनुसार मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण 8 कोटींची थकबाकी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (वर्षा बंगला), वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार (देवगिरी), शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, (सेवासदन), मा.गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता (पर्णकुटी), ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे (रॉयलस्टोन), मा.आदिवासी मंत्री विष्णू सावरा (सागर), अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन संसदीय कार्ये मंत्री गिरीश बापट (ज्ञानेश्वरी), वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (शिवनेरी), परिवहन मंत्री दिवाकर रावते (मेघदूत), उद्योगमंत्री सुभाष देसाई (पुरातन), पर्यावरण मंत्री रामदास कदम (शिवगिरी), सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन), ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (जेतवन), सार्जनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत (चित्रकुट), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले (सातपुडा), पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर (मुक्तागीरी), एकनाथ खडसे (रामटेक), मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मी तोरणा, रामराजा निंबाळकर, विधानसभा सभापती (अजंथा) आणि सह्याद्री अतिथीगृह, व इतर शासकीय निवासांची नावे आहेत.

कोणत्या मंत्र्यांच्या आवासवर किती पाण्याची थकबाकी?

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री वर्षा, जल जोडणी क्र. DX@0416917 रु. 142563/- ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी।
जल जोडणी क्र.DX@0407631 रु.329238/- डिसेंबर 2016 पासून थकबाकी
जल जोडणी क्र. DXX8160008 रु. 2029/- सप्टेंबर 2018 पासून थकबाकी
जल जोडणी क्र. DXX8170002 रु. 17409/- ऑगस्ट 2018 पासून थकबाकी
जल जोडणी क्र. DXX8180007 रु. 54418/- ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी
जलजोडणी क्र.DXX819000 रु. 199324/- ऑगस्ट 2018 पासून थकबाकी

एकूण थकबाकी रु. 744981/-

सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री देवगिरी
जलजोडणी क्र. DXX7520005 रु. 77468/- ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी
जलजोडणी क्र. DXX7510000 रु. 59627/- नोव्हेंबर 2018 पासून1 थकबाकी
जलजोडणी क्र. DXX9240000 रु.7960/- एप्रिल 2019 पासून थकबाकी
एकूण थकबाकी 145055/-*

विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री सेवासदन
जलजोडणी क्र. DXX7570008 एकूण थकबाकी रु. 155273/- ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी

प्रकाश मेहता, गृहनिर्माण मंत्री पर्णकुटी
जलजोडणी क्र.DXX8260003 एकूण थकबाकी रु. 161719/- सप्टेंबर 2018 पासून थकबाकी

पंकजा मुंडे, ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री रॉयलस्टोन
जलजोडणी क्र. DXX8610002 रु.16884/- जानेवारी 2019पासून थकबाकी
जलजोडणी क्र. DXX8480003 रु. 10446/- ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी
जलजोडणी क्र.DXX8490008 रु.7703/-ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी
एकूण थकबाकी 35033

विष्णू सावरा, आदिवासी मंत्री,  सागर
जलजोडणी क्र.DXX7660009 रु. 162325/- ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी
जलजोडणी क्र.DXX7670003 रु.19816/-ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी 
एकूण थकबाकी 182141 

गिरीश बापट, अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन संसदीय कार्येमंत्री ज्ञानेश्वरी
जलजोडणी क्र.DXX8140009 एकूण थकबाकी रु. 59778/- सप्टेंबर 2018 पासून थकबाकी 

गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण जलसंपदा मंत्री शिवनेरी
जलजोडणी क्र. DXX8100000 एकूण थकबाकी रु. 2023/- ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी

परिवहन मंत्री दिवाकर रावते मेघदूत 
जलजोडणी क्र. DXX7650004 एकूण थकबाकी रु. 105484/- ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी

सुभाष देसाई, उद्योगमंत्री पुरातन
जलजोडणी क्र. DXX8290007 रु.148253/- मे 2018 पासून थकबाकी 
जलजोडणी क्र. DXX8300001 रु. 100990/-ऑगस्ट 2018 पासून थकबाकी
एकूण थकबाकी 249243

रामदास कदम, पर्यावरण मंत्री शिवगिरी
जलजोडणी क्र. DXX7580002 एकूण थकबाकी रु. 8988/- ऑक्टोबर 2018

 एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) नंदनवन
जलजोडणी क्र. DXX8350004 187589/- सप्टेंबर 2018 पासून थकबाकी
जलजोडणी क्र. DXX8360009 रु. 24199/- सप्टेंबर 2018 पासून थकबाकी
जलजोडणी क्र.DXX8370003 रु.16636/- सप्टेंबर 2018 पासून थकबाकी 
एकूण थकबाकी रु. 228424

चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री जेतवन
जलजोडणी क्र. DXX8060002 रु. 231676/- मार्च 2018 पासून थकबाकी
जलजोडणी क्र. DXX9310002 रु.383178/- ऑगस्ट 2018 पासून थकबाकी
एकूण थकबाकी 614854

डॉ. दीपक सावंत, सार्जनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री चित्रकुट
जलजोडणी क्र.DXX8270008 एकूण थकबाकी रु.155852/- ऑगस्ट 2018 पासून थकबाकी

राजकुमार बडोले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री सातपुडा
जलजोडणी क्र. DXX8070007 एकूण थकबाकी रु. 106296/- मे 2018 पासून थकबाकी

महादेव जानकर, पशुसंवर्धन मंत्री मुक्तागीरी
जलजोडणी क्र. DXX9320007 रु.119237 सप्टेंबर 2018 पासून1 थकबाकी
DXX8110005 रु. 16953/- नोव्हेंबर 2018 पासून थकबाकी
जलजोडणी क्र. DXX8120000 रु. 33546/- ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी
जलजोडणी क्र. DXX8130004 रु. 3761/- मार्च 2019 पासून थकबाकी
एकूणथकबाकी रु.173497

एकनाथ खडसे रामटेक 
जलजोडणी क्र. DXX9340006 141517/- जून 2018 पासून थकबाकी
जलजोडणी क्र. DXX7540004 रु. 31908/- ऑक्टोबर 2018 पासून1 थकबाक
जलजोडणी क्र. DXX9350000 रु.45519/- मे 2018 थकबाकी
एकूण थकबाकी रु.218998/-

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मी तोरणा
जलजोडणी क्र.DXX8150003 एकूण थकबाकी रु.10682/- ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी

रामराजे निंबाळकर, विधानसभा सभापती अजंथा
जलजोडणी क्र.DXX7620000 एकूण थकबाकी रु. 29032/- ऑक्टोबर 2018पासून थकबाकी 
जलजोडणी क्र.सह्याद्री अतिथीगृह DXX9290003 रु. 1018102/- ऑगस्ट 2018 पासून थकबाकी
जलजोडणी क्र.DXX9290015 रु186288/-जून 2018थकबाकी
एकूण थकबाकी रु.1204390

शासकीय विभाग पाण्याची थकबाकी वेळेवर भरत नसेल तर सामन्य जनते का भरावे ? तसेच महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी मंत्र्यांच्या शासकीय आवासाचे पाणी खंडित करण्याची हिम्मत करणार का? 
शकीव अहमद शेख, माहिती अधिकार कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com