
Crime News: CM शिंदेच्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखाची हत्या; चाॅपर, तलावरीने हल्लेखाेरांनी...
उल्हासनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शाखाप्रमुख शब्बीर शेख यांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच या भागात मध्यरात्री ही हत्या झाली. पाच ते सहा जणांनी ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पूर्व वैमन्यासातून हत्या झाल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आली आहे. हिललाईन पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. जय जनता कॉलनी येथे एका जुगाराच्या क्लब बाहेर ही हत्या झाली आहे. शब्बीर शेख असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
शब्बीर शेख जुगाराचा क्लब चालवत होते. त्यांना नुकतेच शिंदे गटाचे शाखाप्रमुख पद देण्यात आले होते.या घटनेत हल्लेखोरांनी चॉपर, तलवार असे धारदार हत्यारांचा वापर केल्याचे दिसुन आले आहे. हल्लेखोरांनी शब्बीर शेख यांच्यावर दहा ते बारा वेळा वार केले. जखमी अवस्थेत शेख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
शेख यांची परिस्थिती गंभीर बनल्यामुळे त्यांना कल्याण येथील एका रुग्णालयात पाठवण्यात आलं मात्र,उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.