Mumbai : जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

३० वर्षापेक्षा जुन्या इमारतींचा पुनर्विकास हा महत्वाचा मुद्दा आहे. स्वयंपुनर्विकास, डिम्ड कन्व्हेन्स या प्रमुख अडचणी
Chief Minister Eknath Shinde statement Government efforts for redevelopment of old buildings  mumbai
Chief Minister Eknath Shinde statement Government efforts for redevelopment of old buildings mumbaisakal

मुंबई : ३० वर्षापेक्षा जुन्या इमारतींचा पुनर्विकास हा महत्वाचा मुद्दा आहे. स्वयंपुनर्विकास, डिम्ड कन्व्हेन्स या प्रमुख अडचणी आहेत. यासाठी ठोस यंत्रणांची गरज आहे. ही कोंडी फोडण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या परिषदेत बोलताना दिली.

शासकीय जमिनीवरील व म्हाडाच्या संस्थांची संख्या जवळपास १२ हजार आहे. मुंबई बँक ही मुंबईतील सर्व संस्थांची शिखर वित्तीय संस्था व पालक बँक आहे. ९ हजारपेक्षा जास्त सहकारी गृहनिर्माण संस्था या बँकेच्या सभासद आहेत. यामध्ये प्रामुख्याने खडलेला पुनर्विकास पुढे नेणे हे सगळ्यात महत्वाचे काम आहे.

माझी व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा झाली आहे. म्हाडा, एमएसआरडी, सिडको, एमएमआरडीए असेल त्याचबरोबर मुंबई पालिका असेल यांना एकत्र करून जे काही पुनर्विकासाचे रखडलेले प्रकल्प आहेत त्यांना पुढे नेण्याचे काम केले जाईल. ज्या लोकांना भाडे देण्याचे बंद झालेय त्या लोकांना भाडे देण्याचेही काम त्या माध्यमातून केले जाईल अशा प्रकारचे धोरण आणत असल्याचेही शिंदे म्हणाले.

त्याचबरोबर मुख्यमंत्री म्हणाले की, सेल्फ रिडेव्हलपमेंट ही योजना अतिशय प्रभावी आहे. रहिवाशांच्या फायद्याची आहे. स्वयंपुनर्विकासाला निधी देण्याबाबत आम्ही जे धोरण ठरवतोय त्यात या मॉडेलचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होईल व त्या रहिवाशांना फायदा होईल याबाबत राज्य सरकार सकारात्मक दृष्टीने निर्णय घेईल.

तसेच काही इमारतींना ओसी मिळालेला नाही त्यामुळे पुनर्विकास अडकला आहे, त्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे. त्या नेमक्या अडचणी काय आहेत? त्या दूर कशा करता येतील याचाही विचार सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर सरकारी जागेवर ज्या इमारती आहेत त्यांचा १५ टक्के प्रीमियमवरून ५ टक्के प्रीमियम करा ही मागणी आहे.

हा विषयही गांभीर्याने घेतला जाईल असेही ते म्हणाले. हौसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर थेट एफआयआर दाखल करता कामा नये असे आदेश दिल्याचेही ते म्हणाले. ९ मीटर रस्ते रुंद नसल्यामुळे बऱ्याच सोसायट्यांना टिडीआर, प्रीमियम वापरता येत नाही. यातही पुनर्विकासासाठी मोकळ्या जागा, पार्किंग, लिफ्ट आदी प्रीमियम अधिमुल्यातून सूट देण्याबाबतही तशा प्रकारचे निर्देश नगरविकास विभागाला दिल्याचे शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाच सोसायट्यांचा सत्कार

स्वच्छता, पर्यावरण, व्यवस्थापन या विषयांवर आधारित उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाच गृहनिर्माण संस्थांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनादेश, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या पाच सोसायट्यांमध्ये छेडा हाईट्स, रहेजा विस्तार, स्प्लेंडर कॉम्प्लेक्स, विशाल सह्याद्री आणि संजोग को. ऑप. हौसिंग सोसायटीचा समावेश आहे.

या परिषदेला मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, सहकार मंत्री अतुल सावे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक, आमदार विद्या ठाकूर, कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड, भारती लव्हेकर, मनीषा चौधरी,

अमित साटम, वास्तू विशारद चंद्रशेखर प्रभू, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर, दिलीप धोत्रे, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com