...तर मुख्यमंत्री आपलाच - उद्धव ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

मुंबई - पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत शिवसेनेने जो विजय मिळवला, ते सर्व श्रेय शिवसैनिकांचे आहे. आपण असेच जर लढत राहिलो तर आपला मुख्यमंत्री करण्याचे स्वप्नही पूर्ण होईल, असा विश्‍वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी रंगशारदा सभागृहातील बैठकीत व्यक्त केला. 

मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे विलास पोतनिस यांचा विजय झाल्याबद्दल शिवसेनेतर्फे वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ही आभार बैठक घेण्यात आली. या बैठकीत ठाकरे यांनी मतदारांचे आभारही व्यक्त केले. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या जागी विलास पोतनिस यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे डॉ. सावंत नाराज असल्याची चर्चा होती; मात्र डॉ. सावंत नाराज नव्हते, असा खुलासाही ठाकरे यांनी केला. 

पदवी मिळाल्यानंतर नोकरीचा प्रश्‍न असतो. त्यामुळे या पदवीधरांच्या नोकरीचे पाहा. त्यांच्या पोटापाण्याची सोय करून द्या, असे ठाकरे यांनी पोतनिस यांना सांगितले. कार्यकर्ते पुढच्या वेळी मते मागायला गेले तर त्यांना मतदारांनी जाब विचारायला नको, असा सल्लाही त्यांनी दिला. 

Web Title: Chief Minister himself says Uddhav Thackeray